मी धोंडीराम देसाई , मु.आरळे. तालुका : करवीर. जिल्हा:कोल्हापूर. मी एक शेतकरी आहे. शेतीला जोडधंदा म्हणून श्री रासाईदेवी अँग्री प्रोड्यूसर कंपनी मधून सर्व लसीकरण झालेल्या एक महिण्याच्या एक हजार तलंगा घेतल्या.
त्यानंतर मी साडे चार महिने त्याचे सांगोपण केल. त्यानंतर अंडी चालू झाली. दररोज मला ७०० अंडी मिळू लागलीत माझा दररोजचा खाद्याचा खर्च २८०० आणि इतर रोजचा खर्च २०० असा एकूण मिळून ३००० रुपये खर्च मला दररोज येतो. दररोज मला ७०० अंड्यापासून ७ रुपये प्रती अंडे याप्रमाणे ४९०० रु उत्पन्न मला मिळते , त्यामध्ये खर्च वजा जाता निव्वळ नफा मला दररोज २००० रुपये राहतो तरी इतर व्यवसायापेक्षा हा व्यवसाय उत्कृष्ट आहे.
श्री रासाई देवी अग्रो हि शेतकऱ्यांची कंपनी असून याठिकाणी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या अंड्यांचे मोठ्या स्थरावर ब्रान्डींग आणि मार्केटिंग करते आणि शेतकऱ्यांना नफा मिळवून देते तसेच छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना गावरान कुक्कुट पालन करण्यासाठी प्रेरित करते.मला अभिमान कि मी श्री रासाई अग्रो बरोबर जोडलो गेलो माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याला उद्योजक बनवलं.
माझं तरुण पिढीला मला हे सांगण आहे की नोकरीच्या मागे न लागता गावरान कुक्कुटपालन हा व्यवसाय करून आपल्या उत्पन्नात वाढ करावी.
I am Dhondiram Desai, Mu. Arle. Taluka: Karveer. District: Kolhapur. I am a farmer. As a side business to farming, I took one thousand talangs per month from Shri Rasai Devi Agro Producer Company.
After that, I talked to him for four and a half months. After that, the eggs started. Every day I started getting 700 eggs, my daily food expenses were 2800 and other daily costs were 200, totaling 3000 rupees per day. Every day I get an income of 4900 rupees from 700 eggs at 7 rupees per egg, after deducting the expenses, I get a net profit of 2000 rupees per day, but this business is better than other businesses.
Shri Rasai Devi Agro is a company of farmers and here it does branding and marketing of eggs purchased from farmers on a large scale and provides profit to farmers It also trains small and big farmers and motivates them to raise poultry in villages. I am proud that I got associated with Shri Rasai Agro and turned an ordinary farmer like me into an entrepreneur.
I would like to tell the younger generation that instead of chasing a job, they should increase their income by starting a business called rural poultry farming.