मी प्रकाश देवाप्पा देसाई मु.पो -असंडोली, ता-गगनबावडा, कोल्हापूर आम्ही पुर्विपासुमन पारंपारिक शेती करत होतो ,शेतीपूरक एखादा व्यवसाय करायची मनापासून इच्छा होती . मी सण २०१० ला माझे मित्र डॉक्टर मंगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय पोल्ट्री मधून 100 एक दिवसांची पिल्ले आणली त्यामध्ये खर्च वजा जाता चांगला नफा मिळाला माझ्यामध्ये या व्यवसायाबद्दल गोडी निर्माण झाली मग काय.. 100,200, 500 म्हणता म्हणता दोन हजार कोंबड्या आम्ही संगोपन करू लागलो. त्यामध्ये मला अशी अडचण आली की 2000 कोंबड्या चे मार्केटिंग बाहेर करण्यासाठी व्यापारी कोण नव्हते आणि तशी स्थानिकला एवढी विक्री होणे शक्य नव्हते त्या व्यापाऱ्यांना जास्त प्रमाणात कोंबड्या पाहिजे होत्या मग आम्ही आमच्या गगनबावडा तालुक्यातील कुक्कुटपालन करणारे शेतकरी गोळा केले व त्यावेळी चे कृषी अधिकारी माननीय नामदेव परीट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रासाई देवी शेतकरी मंडळ स्थापन केले आणि गटामार्फत आम्ही कुक्कुटपालन व्यवसाय करू लागलो आम्ही दर महिन्याला पाच हजार कोंबड्या मोठ्या करून विक्री करू लागलो . त्यामद्ये आम्हाला अशी अडचण आली की ऑर्डर असून देखील पिल्ली आम्हाला वेळेत मिळायची नाहीत. मग आम्ही सर्व शेतकरी एकत्र आलो आणि आम्ही अहमदनगर मधील पाथर्डी या तालुक्यात असलेल्या हॅचेरीला भेट दिली तिथला सगळा अभ्यास केला त्या ठिकाणी मी स्वतः पंधरा दिवस राहून ट्रेनिंग घेतले व त्या ट्रेनिंगचा फायदा आणि अनुभव घेऊन आम्ही 2018 -19 च्या दरम्यान 2000 पिल्लांची हॅचरी चालू केली आम्ही दर आठवड्याला 2000 पिली तयार करत होतो त्यानंतर 2019 ला कोरोनाचे संकट आले त्यामध्ये आमचे थोडे नुकसान झाले तरी पण आम्ही खचून न जाता 2021 नंतर आम्ही आमच्या शेतकरी गटाचे रूपांतर श्री रासाई देवी ऍग्रो प्रोडूसर कंपनी या मध्ये केले आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली.
आता आमच्या कंपनीत साधारणतः 265 सभासद आहेत हे 265 सभासद स्वतः कुक्कुटपालन व्यवसाय करतात दरम्यान आमच्या कंपनीला सन 2022-23 ला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी स्मार्ट परिवर्तन विकास प्रकल्प मंजूर झाला या प्रकल्पातून आम्ही आमच्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या एक महिन्याच्या कावेरी जातीच्या माद्या देतो व त्यांच्याकडून आम्ही अंडी खरेदी करतो आणि त्या अंड्याची मार्केटिंग आमची कंपनी मोठ मोठ्या शहरात करते शेतकऱ्यांच्या अंड्याला चांगला भाव त्यांना चांगले मार्केट उपलब्ध करून देण्याचे काम आमची कंपनी करते आणि शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हा आमच्या कंपनीचा मुख्य उद्देश आहे.नवीन तरुण पिढीने नोकरीच्या शोधात न लागता नोकर नाही तर स्वतः मालक होऊन कुक्कुटपालन व्यवसाय करावा हा व्यवसाय कमी जागेत जास्त उत्पन्न देणार शेती क्षेत्रातील एकमेव असा व्यवसाय आहे.
I am Prakash Devappa Desai, MP – Asandoli, Taluka-Gaganbawada, Kolhapur. We were doing traditional farming in the past, and I really wanted to do a complementary business. In 2010, under the guidance of my friend Dr. Mangesh Patil, I brought 100 one-day-old chicks from the government poultry farm. After deducting the expenses, I got a good profit. I developed a passion for this business, so what? We started raising 100, 200, 500 chickens. I faced a problem that there were no traders to market 2000 chickens and it was not possible to sell so much to the locals. Those traders wanted more chickens.
Then we gathered the poultry farmers of our Gaganbawda taluka and under the guidance of the then Agriculture Officer, Hon’ble Namdev Parit Saheb, we established the Rasai Devi Shetkari Mandal and through the group we started doing poultry farming business. We started raising five thousand chickens every month and started selling them. In that case, we faced a problem that even though we had orders, we did not get the chicks on time. Then all the farmers came together and we visited the hatchery in Pathardi taluka of Ahmednagar. I myself stayed there for fifteen days and took training there. Taking the benefit of that training and experience, we started a hatchery of 2000 chicks during 2018-19. We were producing 2000 chicks every week. Then in 2019, the Corona crisis hit, although we suffered some losses, but we did not get discouraged. After 2021, we converted our farmer group into Shri Rasai Devi Agro Producer Company and started anew.
Now our company has about 265 members. These 265 members are engaged in poultry farming themselves. Meanwhile, our company was approved for the Late Balasaheb Thackeray Agricultural Smart Transformation Development Project in the year 2022-23. Through this project, we provide high-quality one-month-old Kaveri breed females to our farmers and we purchase eggs from them and our company markets those eggs in big cities. Our company works to provide good prices for farmers’ eggs and a good market for them. The main objective of our company is to maximize the benefit of farmers. The new young generation should not look for jobs but become their own owners and start poultry farming. This business is the only business in the agricultural sector that will give more income in less space.